श्रींचे विचार

चमत्कार ही एक चोरी आहे!

सृष्टीमध्ये कोणालाही चमत्कार होत नाही. वस्तू शून्यातून निर्माण होऊच शकत नाही. मी शून्यातून वस्तू निर्माण करतो असे जो सांगतो तो लबाड मानावा. हा मनुष्याच्या पेशीवर वाशिकारणाचा परिणाम समजावा. जादू वगैरे येतो हा मतिभ्रम होय. चमत्कार करून अंगठ्या काढून दाखविणारे हजारो अंगठ्या का काढीत नाहीत? या देशातल्या भुकेलेल्या लाखो लोकांना यांनी चमत्काराने धान्य पुरवावे व त्यांची भूक भागवावी. शून्यातून जर वस्तू निर्माण होत असेल तर मग अणूशक्तीसुद्धा निर्माण झाली पाहिजे. साऱ्या चमत्कार बहाद्दरांना माझे आव्हान आहे की माझ्या समोर त्यांनी चमत्कार करून दाखवावे.

No comments:

Post a Comment