१. दत्तवाडी
श्री मुक्तेश्वर नारायण दत्तानंद ट्रस्ट,ए-८३९ बुलढाणा,
मु. दत्तवाडी पो. नैकोटा ता. सोनपेठ जि. परभणी
२. पाचलेगांव
श्री मुक्तेश्वर नारायण दत्तानंद ट्रस्ट,शाखा: पाचलेगांव
ए-८३९ बुलढाणा,
मु. पो. पाचलेगांव ता. जिंतूर जि. परभणी
३. खामगांव
श्री निर्गुनपादुका संचारेश्वर ट्रस्ट,ए-८४१ बुलढाणा,
मुक्तेश्वर आश्रम, खामगांव-४४४३०३
फोन नं: ०७२६३-२५४८०२
४. मुंबई
श्री चिन्मय पादुका संचारेश्वर ट्रस्ट,ए-८४० बुलढाणा,
वालजी लाधा रोड, मुक्तेश्वर आश्रम,
मुलुंद (प.)
मुंबई-४०००८०
५. नांदेड
पत्ता :श्री संत पाचलेगांवकर महाराज,
ए-२३२४,
मुक्तेश्वर आश्रम, वसंत नगर नांदेड,
ता. जि. नांदेड – ४३१६०२
फो. नं. - ०२४६२ – २८७१०८
माहिती:
श्री संत पाचलेगांवकर महाराजांचे नांदेड शहराशी जिव्हाळ्याचे नाते होते. महाराज नेहमी नांदेडला येत. त्यांच्या प्रवचनास शेकडो लोक जमत असत. त्यात आस्तिक व नास्तिक असत, बुद्धीजीवी असत आणि राष्वादीही असत. १९८० साली वसंत नगर मध्ये नियोजित मुक्तेश्वर आश्रमाचे भूमिपूजन महाराजांच्या हस्ते संपन्न झाले.
१९८१ साली महाराजांनी या आश्रमाला स्वहस्ते मुक्तेश्वराची स्थापना केली. महाराज या आश्रमाला दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ते भगवान शंकराची आगळी वेगळी आराधना (पूजा) करीत. एकीकडे भगवान शंकराला दुधाचा आभिषेक तर दुसरीकडे अनेक बाटली रक्त शासकीय रुग्णालयाला अश्रामातर्फे देण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक व राष्ट्रीय भावना समाजात रुजविली जाते. ओरिसा, तामिळनाडू मधील सुनामी, भूकंप, आपतग्रस्ताना आर्थिक मदत पाठविण्यात आली. महाराजांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजही मुक्तेश्वर आश्रमातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आश्रमात मानसोपचार केंद्र स्थापन केले असून आजही मानसिक व्याधीग्रस्त लोक श्रद्धेने येथे येतात. ममतेने, प्रेमाने, त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य होते.
मुक्तेश्वर आश्रम हा पीडितांचा विसावा, रचनात्मक कार्याचे प्रेरणा स्थान, साधकांचे साधना केंद्र आहे. येथे बालसंस्कार, योगाभ्यास केंद्र चालविले जाते. तसेच प्रत्येक सोमवारी मोफत शरीरी तपासणी व औषधीचे वितरण होते. त्याचा उपयोग अनेक गरीब रुग्णांना होत आहे.
महाराजांच्या अभिप्रेत कार्याचे प्रतिबिंब येथील भक्तांतर्फे आयोजित विविध कार्यक्रमात दिसते.
६. नागपूर
पत्ता :श्री संत पाचलेगांवकर महाराज,
ई-१२९६ (नागपूर),
पाचलेगांवकर चौक, आश्रम मार्ग,
कापरी- नागपूर – ४४११०८
फो. नं. ०७१०३-७५५८१
माहिती:
श्री संत पाचलेगांवकर महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थानात राष्ट्रधर्माचा प्रचार करण्यासाठी अनेक ठिकाणी मुक्तेश्वर आश्रमांची स्थापना केली आहे. नागपूर येथेही १-८-१९८३ रोजी नागपूर येथून १५ कि.मी. अंतरावर कापरी येथे श्री रामभाऊ पाटील यांनी अर्पण केलेल्या २४०० वर्ग फूट जागेचे श्रींनी स्वतः भरपावसामध्ये भूमीपूजन केले. १५-०३-१९९० साली या आश्रमाचे ट्रस्ट स्थापन झाले. आज १६२०० वर्ग फूट जागेवर ३५ लाखांचे काम झाले आहे.
७. लातूर
पत्ता:श्री संत पाचलेगांवकर महाराज प्रतिष्ठान,
मुक्तेश्वर आश्रम,
आनंदवाडी - शिरूर आनंद्पाळ,
जि. लातूर – ४१३५४४
माहिती:
प. पू., राष्ट्रसंत, धर्म संस्थापक, श्री संत पाचलेगांवकर महाराज ह्यांनी आपले कार्य पूर्ण करण्यासाठी मुक्तेश्वर आश्रमाची स्थापना केली. आनंदवाडी येथील महाराजांचे शिष्य श्री भागवत लक्ष्मणराव शिरुरे यांनी अडीच एकर जमीन महाराजांच्या आश्रमासाठी दान केली आहे. येथे संत श्री पाचलेगांवकर महाराज, श्री गुरुदेव दत्त व ज्ञानेश्वर मावली ह्यांचे भव्य-दिव्य मंदिर व आश्रम उभारण्यात येत आहे. तसेच गुरु माधवाश्रम स्वामी व ग्रामदेवतेचेही मंदिर उभारण्यात येत आहे. समोर भव्य सभामंडप व याच आश्रमाला विद्यामंदिर उभारण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment